8th Pay Commission | कधी गठीत होणार 8वा वेतन आयोग? किती वाढणार सॅलरी? जाणून घ्या सर्वकाही

0

नवी दिल्ली : 8th Pay Commission | केंद्र सरकारच्या १ कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांकडून ८व्या वेतन आयोगाची मागणी जोर धरू लागली आहे. सरकारने लवकरात लवकर वेतन, भत्ता आणि पेन्शनचे पुनरिक्षण करण्यासाठी आठवा वेतन आयोग गठीत करवा, अशी मागणी कर्मचारी संघटना करत आहेत. आता नॅशनल कौन्सिल (स्टाफ साईड, जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशीनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज) चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सरकारला पत्र लिहून ही मागणी केली आहे.

यामुळे अपेक्षा आहे की २०२६ मध्ये आठव्या वेतन आयोगाचे गठन होऊ शकते. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत २५ ते ३५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. जर असे असेल तर किमान बेसिक सॅलरी दर महिना जवळपास २६ हजार रुपये होईल. फिटमेंट फॅक्‍टरसुद्धा २.५७ वरून वाढवून ३.६८ करण्याची अपेक्षा आहे.

वेतन आयोग सरकारकडून नियुक्त एक विभाग आहे. हा विभाग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आराखडा, भत्ते आणि लाभांचे पुनरिक्षण करून त्यामध्ये बदलाची शिफारस करतो. हा विभाग महागाईसारख्या बाहेरील कारकांचा विचार करत आवश्यक समायोजनाचा प्रस्ताव करतो. प्रत्येक १० वर्षात हा आयोग बैठक घेतो. २८ फेब्रुवारी, २०१४ ला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ७वा वेतन आयोग गठित केला होता. आयोगाने १९ नोव्हेंबर, २०१५ ला आपला रिपोर्ट सरकारला सोपवला आणि त्याच्या शिफारसी १ जानेवारी, २०१६ पासून लागू केला होता.

कधी गठित होईल ८ वा वेतन आयोग?

वेतन आयोगाचे गठन आपल्या देशात १० वर्षाने होते. यावेळेस आठवा वेतन आयोगाचे गठन १ जानेवारी, २०२६ पर्यंत केले जाईल. मात्र, आतापर्यंत केंद्राकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.