Katraj Pune Crime News | पुणे : विवाहित महिलेला ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी, दोघांवर गुन्हा

0

पुणे : Katraj Pune Crime News | विवाहित महिलेच्या घरी येऊन तिच्या नकळत बेडरुम मधील फोटो काढले. ते फोटो महिलेला दाखवून फिरायला येण्याची मागणी करुन ऐकले नाहीतर पतीला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2024 ते 8 जून या कालावधीत कात्रज परिसरात घडला आहे.

याबात 30 वर्षीय विवाहित महिलेने सोमवारी (दि.17) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन देवीदास विठ्ठल बिराजदार Devidas Vitthal Birajdar (वय-40), धिरज पाटील (दोघे रा. कात्रज) यांच्यावर आयपीसी 354, 354(ब), 354(ड), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना सीआरपीसी कलम 41 नुसार नोटीस दिली आहे. (Molestation Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिराजदार याने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या नकळत बेडरुममधील फोटो काढले. ते फोटो महिलेला दाखून मी सांगेल तेंव्हा माझ्यासोबत फिरायला यायचे नाही ऐकले तर तुझ्या नवऱ्याला व मुलाला मारून टाकेन अशी धमकी दिली. तसेच महिलेला शरीरावर टॅटू काढण्यास भाग पाडले. आम्ही सांगू तसे वागायचे नाहितर फोटो पतीला दाखवण्याची धमकी बिराजदार आणि पाटील यांनी महिलेला दिली. पिडीत महिला बाहेर गेल्यानंतर तिचा पाठलाग करुन तिच्या सोबत गैरवर्तन केले. आरोपींच्या धमकीला घाबरून महिलेने तक्रार केली नाही. मात्र, आरोपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन नोटीस दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन तिला जाळ्यात ओढले. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. याबाबत कोणाला काही सांगितले तर बदनामी करण्याची धमकी दिली. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडला आहे. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी रुद्र वाध्याये (रा.नागपूर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 376/3, 506 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.