Bhavani Peth Pune Crime News | पुणे : तलवार-कुऱ्हाडीने दोघांवर वार, दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक

0

पुणे : Bhavani Peth Pune Crime News | तलवार-कुऱ्हाडीने मारहाण (Sword-Axe Attack) करुन परिसरात दहशत पसरवणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या खडक पोलिसांनी (Khadak Police Station) मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) आहेत. हा प्रकार रविवारी (दि.16) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील काशेवाडी (Kashewadi) येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे.

याबाबत जखमी प्रथमेश राजेंद्र सावंत (वय-22 रा. भवानी पेठ, धम्मपाल संघ, काशेवाडी) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सिद्धार्थ उर्फ देव्या कांबळे (वय-25), श्रीधर उर्फ श्री निलेश शिंदे (वय-19), प्रणव उर्फ सोयम वायदंडे (वय-18), मंदार उर्फ बाबु सोरटे (वय-27 सर्व रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) यांच्यावर आयपीसी 307,324, 323, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा मोठा भाऊ सागर सावंत याला घरातून बाहेर बोलवून घेतले. प्रणव वायदंडे याने आमच्यावर केलेली केस मागे घेतली नाहीस तर आत्ता तुझा मर्डर करेन अशी धमकी सागर याला दिली. तर सिद्धार्थ याने दुचाकीत लपवून ठेवलेली तलवार बाहेर काढून सागरच्या डोक्यात मारली. मात्र, त्याने वार हुकवून तेथून पळून जाऊ लागला. त्यावेळी निलेश याने हातातील कुऱ्हाड सागरच्या दिशेने फेकून मारली.

सागर पळून गेल्यानंतर सिद्धार्थ याने फिर्यादी प्रथमेश याच्या डोक्यात तलवार मारली. तर सागरचे सासरे यांच्या डोक्यात मोठा दगड मारुन गंभीर जखमी केले. आरोपींनी हातातील हत्यारे हवेत फिरवत परिसरात दहशत पसरवली. तसेच आम्ही येथील भाई आहे, आमच्या नादाला लागु नका कुणीही मध्ये यायचे नाही, असे म्हणत लोकांना शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार करीत आहेत.

आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आरोपी सिद्धार्थ कांबळे याच्यावर खडक पोलीस ठाण्यात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर निलेश शिंदे याच्यावर खडक आणि वानवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. मंदार सोरटे याच्यावर खडक आणि वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) चार गुन्हे दाखल असून सोयम याच्यावर खडक पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.