Gold-Silver Rate | सोन्याचा भाव विचारू नका! जाईल 1,00,000 रूपयांच्या पुढे, चांदीही दाखवतेय रूबाब; जाणून घ्या कुठे पोहोचला दर

0

नवी दिल्ली : Gold-Silver Rate | २०२४ मध्ये सोने-चांदीत मोठी हालचाल आहे. सोन्याच्या किमतीत मोठी उलथा-पालथ होत आहे. यावर्षी सोन्याच्या दराने आपला ऑल टाइम हायचा रेकॉर्ड तोडला आहे. सोने एकीकडे रोज नवनवीन विक्रम करत असताना चांदीचा दर १ लाखाचा आकडा पार करण्यासाठी उताविळ आहे. सोने ७४१६.६० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे तर चांदीने ९० हजारचा आकडा गाठला आहे. चांदीचा दर ८८०१० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

१ लाख रुपयांच्या पुढे जाईल सोने

सोने-चांदी नेहमी सुरक्षित गुंतवणूक पर्याय समजला जातो. पण सोने ७५ हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात सोन्याचा दर आणखी वाढू शकतो.

अखिल भारतीय रत्न आणि दागिने अंतर्गत परिषदेचे अध्यक्ष सय्यम मेहरा आणि उपाध्यक्ष राजेश गोखले म्हणाले, आगामी काळात सोन्यात आणखी तेजी येऊ शकते. जगभरात वेगवेगळ्या देशात निवडणुका होत आहेत, रशिया-युक्रेन युद्धामुळे ग्लोबल बाजारावर दबाव आहे. अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदरात घट होण्याच्या शक्यतेने सोन्याच्या किमतीत तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात सोन्याचा भाव २६०० ते २८०० डॉलर म्हणजे ७८००० ते ८०००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचेल. तेजी सुद्धा कायम राहील, पुढील दोन-अडीच वर्षात सोने १ कोटी रुपये प्रति किलोग्रॅमचा आकडा पार करू शकते.

मुथूट फायनान्सच्या रिपोर्टनुसार, ज्याप्रकारे सोन्याचा दर वाढत आहे, ते पाहता २०२९ पर्यंत सोने १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा आकडा पार करू शकते. रिपोर्टनुसार, सोन्याचा भाव १,०१,७८९ रुपयांपर्यंत जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.