AEBAS | ‘लेट लतिफ’ केंद्रीय कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, अटेंडन्सबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

0

नवी दिल्ली : DA Hike | तुम्ही सुद्धा केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा होण्यापूर्वी मोठी अपडेट आली आहे. कामावर उशीरा पोहचणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून इशारा देण्यात आला आहे. जे कर्मचारी सतत उशीरा कामावर येतात अथवा लवकर जातात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.(7th Pay Commission)

सरकारच्या निदर्शनास आले आहे की, कर्मचारी आधार इनेबल बायोमीट्रिक अटेंडन्स सिस्टम (AEBAS) मध्ये आपली हजेरी लावत नव्हते. इतकेच नव्हे तर काही कर्मचारी दररोज उशीरा कामावर येत होते. याबाबत माहिती मिळाल्यावर सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले.

या आदेशात कामगार मंत्रालयाने न चुकता मोबाईल फोन बेस्‍ड फेस ऑथेंटिकेशन सिस्टम वापरण्याचा सल्ला दिला, हे हजेरी नोंदवण्यासह लाईव्ह लोकेशन डिटेक्शन आणि जियो-टॅगिंगसारख्या सुविधा सुद्धा देते. आदेशानुसार, AEBAS सक्तीने लागू करण्याबाबत विचार करण्यात आला.

विभाग प्रमुख नियमितपणे सरकारी वेबसाईट www.attendance.gov.in वरून अटेंडेंस रिपोर्ट डाऊनलोड करतील आणि असे कर्मचारी ओळखून पुढील कारवाई करतील.

सरकारी नियमानुसार एक दिवस उशिरा हजेरी लागल्यास अर्धा दिवसाची कॅज्युअल लिव्ह कापली जाईल. जर एखाद्या महिन्यात दोन वेळा आणि योग्य कारण सांगून उशीरा आला असेल तर कमाल एक तासाचा उशीर माफ केला जाईल.

हा निर्णय कार्यालयातील मोठा अधिकारी घेऊ शकतो. सीएल कापण्यासह जे सरकारी कर्मचारी वारंवार उशीरा ऑफिसला येतात, त्यांच्याविरूद्ध कारवाई सुद्धा केली जाईल. कारण असे वारंवार उशीरा येणे नियमानुसार मि‍सकंडक्ट रूल्‍समध्ये येते.

Leave A Reply

Your email address will not be published.