Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: टपरी ठेवण्याच्या कारणावरुन एकाला रॉडने मारहाण, एकाला अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्र्याची टपरी ठेवण्यावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण (Marhan) करुन जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.13) सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान भोसरी येथील बापूजी बुवा चौकात (Bapugi Buwa Chowk Bhosari) घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

विठ्ठल गेणु लोंढे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत विठ्ठल यांचा मुलगा रोहित विठ्ठल लोंढे (वय-23 रा. आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विजय किसन शेवते (वय-54 रा. बापुजी बुवा चौक, भोसरी) याला अटक केली आहे. तर कौस्तुभ विजय शेवते, तेजस धनंजय शेवते व दोन महिला (सर्व रा. भोसरी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 143, 147 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील बापुजी बुवा चौकात त्यांच्या मालकीच्या जागेत पत्र्याची टपरी ठेवत होते. त्यावेळी आरोपींनी टपरी ठेवण्याच्या कारणावरुन फिर्यादी यांच्या वडिलांना हाताने, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. यामध्ये विठ्ठल लोंढे जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जुन्या भांडणातून हातोड्याने मारहाण

वाकड : भांडणाच्या रागातून एका व्यक्तीच्या डोक्यात भिंतीला टाचे मारण्याचे लोखंडी पाते असलेल्या हातोडीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार रहाटणी फाटा (Rahatani Phata) येथील धनराज बिअर शॉपी समोर रोडवर घडला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) एका व्यक्तीला अटक केली आहे.

नाथा सावंत (वय-43 रा. रहाटणी फाटा, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत 19 वर्षाच्या तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रविंद्र भागवत राठोड (वय-42 रा. पडवळ नगर, थेरगाव) याच्यावर आयपीसी 307, 323 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे वडील नाथा सावंत यांच्यात भांडण झाले होते. आरोपीने चिडून जाऊन फिर्यादी यांच्या वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात हातोडी मारुन जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये नाथा सावंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.