Free Aadhaar Update | पुन्हा एकदा वाढली मोफत ‘आधार अपडेट’ करण्याची डेडलाईन, जाणून घ्या नवीन तारीख

0

नवी दिल्ली : Free Aadhaar Update | आधार यूजर्ससाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. UIDAI ने पुन्हा एकदा मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची डेडलाईन वाढवली आहे. यापूर्वी ही कालमर्यादा १४ जून २०२४ ला संपणार होती, जी आता तीन महिन्यांसाठी वाढवून १४ सप्टेंबर, २०२४ पर्यंत केली आहे. आता आधार कार्डधारक १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत मोफत आधार ऑनलाईन अपडेट करू शकतात (Free Aadhaar Card Update Deadline Extended).

१० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक
युआयडीएआयने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांचे आधार १० वर्ष अथवा त्यापेक्षा जुने झाले असेल तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या.

डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करण्यासाठी मागितलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील. मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा केवळ ऑनलाईन मिळत आहे. तर आधार सेंटरवर जाऊन डिटेल्स अपडेट केल्यास शुल्क द्यावे लागेल.

ऑनलाईन आधारमध्ये डिटेल्स अशाप्रकारे करा अपडेट –

  • यासाठी सर्वप्रथम युआयडीएआयची अधिकृत वेबसाईट https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या.
  • येथे आपल्या मोबाईल नंबरच्या मदतीने ओटीपी टाकून लॉगिन करा.
  • यानंतर तुमचे सर्व डिटेल्स जसे की पत्ता इत्यादी तपासून घ्या.
  • जर काही डिटेल्स जसे की पत्ता बदलायचा असेल तर तो पर्याय निवडा.
  • पत्ता अपडेट करण्यासाठी मागितलेले कागदपत्राचे पुरावे अपलोड करा.
  • यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १४ नंबरचा अपडेट रिक्वेस्ट नंबर मिळेल, ज्याद्वारे तुम्ही आधार अपडेट प्रक्रिया ट्रॅक करू शकता.
Leave A Reply

Your email address will not be published.