Gautam Adani | डिफेन्स सेक्टरमध्ये वाढणार गौतम अदानींचा दबदबा… UAE च्या कंपनीसोबत मोठी डील, बनवणार ड्रोन आणि मिसाईल

0

नवी दिल्ली : Gautam Adani | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय उद्योगपती आणि अदानी समुहाचे चेयरमन, देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्त गौतम अदानींचा (Adani Group) दबदबा आता संरक्षण क्षेत्रात वाढणार आहे. कारण, त्यांची कंपनी अदानी डिफेन्स अँड एयरोस्पेस (Adani Defence and Aerospace) ने UAE ची कंपनी EDGE Group सोबत डील केली आहे. या करारांतर्गत आता दोन्ही कंपन्या मिळून लष्करासाठी मिसाईल-ड्रोनसह इतर आधुनिक शस्त्र बनवतील.

शस्त्रांच्या निर्मितीसह या कामावर भर

मंगळवारी अदानी समुहाकडून या कराराबाबत माहिती शेयर करण्यात आली. यामध्ये सांगितले आहे की, अदानी डिफेन्स अँड एयरोस्पेस आणि ऐज ग्रुप मिळून आधुनिक शस्त्रांच्या निर्मितीसह इलेक्ट्रॉनिक आणि सायबर सिस्टम डेव्हलपमेंटमध्ये मिळून काम करतील.

दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार, रिसर्च आणि डेव्हलपमेंट फॅसिलिटीज स्थापन करण्यावर विचार करण्यासह डिफेन्स सेक्टरमध्ये टेक्निकल ग्रोथवर सुद्धा जोर दिला आहे.

एक ग्लोबल प्लॅटफॉर्म स्थापन होणार

या कराराचा उद्देश अदानी ग्रुप आणि ऐज ग्रुपच्या दोन्ही कंपन्यांची डिफेन्स आणि एयरोस्पेस क्षमतांचा वापर करत ग्लोबल प्लॅटफॉर्म स्थापन करणे आहे. ज्यामुळे दोन्हीचे संबंधित प्रॉडक्ट पोर्टफोलियो सोबत सादर करता येऊ शकतील.

यामध्ये एजे आणि अदानींच्या मुख्य प्रॉडक्ट डोमेनमध्ये सहकाराचे मुल्यांकन करण्याचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये हवाई, नौदल, पायदळ, दारूगोळा आणि एयर डिफेन्स प्रॉडक्ट्स कव्हर करणारी मिसाईल्स आणि मानवरहित हवाई प्रणाली, युद्ध सामुग्री, काऊंटर ड्रोन सिस्टमसह सायबर टेक्नोलॉजीचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.