ACB Trap On PMC Clerk In Pune | लाच घेताना पुणे महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यात

0

पुणे : – ACB Trap On PMC Clerk In Pune | नवीन बांधलेल्या घराचा कर (PMC Property Tax) कमी करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील (Aundh Baner Ward Office) दोन लिपिकांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सुमीत राजेंद्र चांदेरे Sumit Rajendra Chandere
(वय 28), प्रशांत शिवाजीराव घाडगे Prashant Shivajirao Ghadge (वय 34) अशी अटक करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत. मंगळवारी (दि.11) रात्री उशिरा दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि. 10)तक्रार दिली होती. सुमित चांदेरे आणि प्रशांत घाडगे पुणे महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात टंकलेखक लिपीक पदावर काम करतात. तक्रारदाराने नवीन घर बांधले आहे. कर आकारणीसाठी तक्रारदाराने क्षेत्रीय कार्यालयात अर्ज केला होता. कर आकारणी कमी करून देतो, असे क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक घाडगे याने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. त्यासाठी घाडगे आणि चांदेरे यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. ज्येष्ठ नागरिकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (Pune Bribe Case)

एसीबीच्या पथकाने सोमवारी पडताळणी केली असता सुमित चांदेरे व प्रशांत घाडगे यांनी तक्रारदार यांच्या नवीन बांधलेल्या घराची कर आकारणी कमी करण्यासाठी व बिल कमी करुन देण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 25 हजारांची लाच घेणाऱ्या चांदेरे आणि घाडगे यांना रंगहेत पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.