Murlidhar Mohol | मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना लॉटरी; मोहोळ यांना PMO तून मंत्रिपदासाठी फोन

0

पुणे: Murlidhar Mohol | मोदींच्या मंत्रिमंडळात (Modi Cabinet 2014) कोणाकोणाला स्थान असणार आहे याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचीही मंत्रिपदासाठी वर्णी लागणार असल्याचे बोलले जातेय.

खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून (PMO) फोन आल्याची माहिती आहे. याआधी महाराष्ट्रातील चार खासदारांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असं सांगण्यात येत होते. त्यात आता मोहोळ यांची भर पडली आहे.

महाराष्ट्रातून आतापर्यंत नितीन गडकरी (Nitin Gadkari), पीयूष गोयल (Piyush Goyal), रक्षा खडसे (Raksha Khadse), प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), रामदास आठवले (Athawale Ramdas), मुरलीधर मोहोळ यांना फोन आले आहेत. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे.

त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात सहभाग होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा पराभव केला होता. महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.