Mega Block On Pune Lonavala Railway Line | रविवारी पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर ‘मेगा ब्लॉक’, लोकलसह डेक्कन क्वीन रद्द

0

पुणे : – Mega Block On Pune Lonavala Railway Line | मध्य रेल्वेने पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावर कामशेत- तळेगाव दरम्यान किमी 154/0-1 येथे असलेल्या पुल क्रमांक 154/1 चे लोखंडी गर्डरच्या कामासाठी साहा आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्याच्या कामासाठी रविवारी (दि.9) मेगा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे डेक्कन क्विन या एक्सप्रेस आणि पुणे-लोणावळा दरम्यान सहा लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.

याशिवाय पाच मेल एक्सप्रेस गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या देशभाल सुरक्षिततेसाठ तसेच अभियांत्रिकी कर्यासाठी हा मेगा ब्लॉक करणे आवश्यक आहे. त्यामुळे गैरसोयमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या लोकल गाड्या रद्द

  • लोणावळा-पुणे लोकल गाडी क्र. 01561
  • लोणावळा-शिवाजीनगर-गाडी क्र.01563
  • पुणे-लोणावळा गाडी क्र . ⁠01566
  • शिवाजी नगर-तळेगाव गाडी क्र. 01588
  • तळेगाव-पुणे गाडी क्र. 01589

तसेच मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 11007), पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 11008), मुंबई-पुणे डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 12123) आणि पुणे-मुंबई डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 12124) या चार एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या मेल एक्सप्रेसचे नियमन

  • एमजीआर चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन 12164) ही गाडी 8 जून रोजी 3 तास 30 मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल.
  • मुंबई-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन 22159) ही गाडी 9 जून रोजी 30 मिनिटांकरीता रेगुलेट करण्यात येईल.
  • लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस (ट्रेन 17222) ही गाडी 9 जून रोजी 15 मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल.
  • तिरुवनंतपुरम मुंबई-एक्स्प्रेस (ट्रेन 16332) ही गाडी 8 जून रोजी 15 मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल.
  • दौंड-इंदूर एक्स्प्रेस (ट्रेन 22943) ही गाडी 9 जून ला 15 मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल.
Leave A Reply

Your email address will not be published.