FIR On Vishal Surendrakumar Agarwal | ‘माझे अंडरवर्ल्डशी संबंध… पोलीस खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करील…’; इस्टेट एजंटला धमकावणाऱ्या अग्रवाल पिता-पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

पुणे : – FIR On Vishal Surendrakumar Agarwal | अंडरर्ल्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलीस मी खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुला ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाही, अशी धमकी देऊन इस्टेट एजंटची एक कोटी 32 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अग्रवाल पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अग्रवाल पिता-पुत्रांवर चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता इस्टेट एजंटची फसवणूक केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने अग्रवाल पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला गेला आहे. पुणे पोलीस अग्रवाल कुटुंबावर एका मागे एक गुन्हे दाखल करत आहेत.

याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (वय-45 रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्त अग्रवाल Surendra Kumar Agarwal (वय-77) बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय-50), जसप्रीतसिंग राजपाल यांच्यावर आयपीसी 420, 406, 504, 506, 120(बी), 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुश्ताक मोमीनची एम.एम. असोसीएटस व वास्तू प्रॉपर्टीज या नावाची इस्टेट एजंन्सी आहे. पुणे आणि इतर शहरात प्लॉट डेव्हलपमेंट आणि त्यासंदर्भातील परवाने मिळवून देण्याचे काम फिर्यादी करतात. सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि जसप्रीतसिंह राजपाल यांचे कोंढव्यातील ब्रह्मा काउन्ट च्या मागे असणाऱ्या जागेवरुन निवृत्ती कोपरे यांच्यासोबत वाद होते.

आरोपींनी फिर्यादी यांची जुलै 2019 मध्ये भेट घेऊन जागेचा वाद मिटवून देण्याबाबत विचारणा केली होती. यानंतर फिर्यादी यांनी परवान्याचे कामे करुन जागेवरील वाद मिटवून देतो असे सांगितले. यानंतर त्यांच्यामध्ये वाटाघाटी करुन जागेचा वाद सोडवून दिल्यास तसेच जागे बाबत काही कामे करुन दिल्यास दीड कोटी रुपये मानधन देण्यस करार केला होता. मात्र, आरोपींनी पैसे न देता मुश्ताक मोमीन यांची आर्थिक फसवणूक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.