Pune Shanipar Fire News | पुण्यातील शनिपारमधील मुलींच्या वसतीगृहाला भीषण आग, एकाचा मृत्यू, 42 जणी बचावल्या

0

पुणे : – पुणे शहरातील शनिपार (Pune Shanipar Fire News) परिसरातील एका मुलींच्या पीजी (PG) निवासस्थानाला गुरुवारी (दि.6) रात्री लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला तर 42 जणांना वाचवण्यात यश आले. मृत व्यक्ती इमारतीचा वॉचमन असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर उपस्थित असलेल्या मुलींची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली. आग नंतर आटोक्यात आणल्याचे पुणे अग्निशमन विभागाने म्हटले आहे. (Pune News)

ही घटना साधारण दीडच्या सुमारास घडली. पाच मजली वसतिगृहाच्या (Girls Hostel) इमारतीला आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृहात 42 विद्यार्थिनी राहत होत्या, आग लागताच त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. दरम्यान, आग विझवत असताना येथील इमारतीचा सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला.

आगीत 40 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी ससून हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, ही घटना पहाटे दीडच्या सुमारास घडली. आग लागल्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृहात राहणाऱ्या 42 मुलींना बाहेर काढण्यात आले. पाच मजली इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तळमजल्यावरील अकाउंटिंग अॅकॅडमीमध्ये आग लागल्याचे जवानांना दिसले. जवानांनी पाणी मारून आग विझवली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती वॉचमन होता. जो जमिनीवर एका खोलीत झोपला होता. यात भाजल्यामुळे त्याला ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.