Vishrantwadi Pune Crime News | पुणे : रोडरोमियो कडून तरुणीची भररस्त्यात छेड, लोकांच्या मदतीने दिले पोलिसांच्या ताब्यात

0

पुणे : – Vishrantwadi Pune Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीची छेड काढून तसेच त्यांच्यासोबत अश्लील वर्तन करण्याच्या घटना पुणे शहरात वारंवार घडत आहेत. विश्रांतवाडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करुन अश्लील वर्तन करणाऱ्या रोडरोमियोला लोकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार सोमवारी (दि.3) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास टिंगरेनगर (Tingre Nagar Vishrantwadi) येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे.

याबाबत 19 वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. गौरवसिंग राजेंद्रसिंग लोहेट (वय-20 रा. बि यु भंडारी, आकांशा सोसायटी, टिंगरेनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(ड) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास टिंगरेनगर येथील सार्वजनिक रोडवरून पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी त्याच्या स्कुटीवरुन आला. (Molestation Case)

त्याने फिर्यादी यांना पाहुन त्याची दुचाकी वळवून पाठलाग करण्यास सुरवात केली. काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना अश्लील स्पर्श करुन अंगावरील ड्रेस ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांनी लोकांच्या मदतीने आरोपी गौरवसिंग याला दुचाकीसह पकडून विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.