Murlidhar Mohol | पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत

0

पुणे: Murlidhar Mohol | लोकसभा निवडणुकीची (Pune Lok Sabha Election Results 2024) मतमोजणी सुरु आहे. राज्यातील लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुण्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीने झाल्याचं पाहायला मिळालं.

भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचितकडून वसंत मोरे (Vasant More) हे लोकसभेच्या रिंगणात होते. पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळांची जादु चालली आहे. पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला आहे.गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यामुळे बापटांची जागा राखण्याचे आव्हान भाजपसमोर होते .

पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर उभे ठाकले होते. दोघांमध्ये चुरशीची लढत होती. तगडी फाईट असल्याने पुण्यात खासदार नेमका कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी दोघांनीही थेट आम्हीच जिंकणार असल्याचा दावा केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.