Kolhapur Lok Sabha – Shahu Maharaj | शाहू महाराजांची निर्णायक आघाडी ; मतदारांकडून मत आणि मान गादीलाच

0

कोल्हापूर: Kolhapur Lok Sabha – Shahu Maharaj | अत्यंत चुरशीने होत असलेल्या कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम आहे. शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून मान गादीला आणि मत मोदीला अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला होता.

मात्र, शाहू महाराजांनी विजयाकडे केलेली वाटचाल पाहता कोल्हापुरात मान आणि मत गादीला दिल्याचे स्पष्ट होत आहे. आठ फेऱ्यांची मतमोजणी पार पडली असून शाहू महाराजांची लीड ५४ हजारांवर पोहोचले आहे.

दरम्यान, निर्णायक आघाडीकडे वाटचाल सुरू केल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी कोल्हापूर शाहू महाराजांचा कोल्हापुरातून विजय निश्चित असल्याचे म्हटलं आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सुद्धा महाराजांच्या विजयाविषयी विश्वास व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.