Loni Kalbhor Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, 10 लाख रुपये उकळले

0

पुणे : – Loni Kalbhor Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) एका महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) एका व्यक्तीवर बलात्कार (Rape Case) व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील 14 वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.

याबाबत 37 वर्षीय महिलेने शनिवारी (दि.1) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सतिश दिलीप काळभोर Satish Dilip Kalbhor (वय-36 रा. कुंजीरवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन सह 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप सतीश काळभोर याचा आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी आणि महिलेची 2010 मध्ये ओळख झाली. सतीश याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. त्याठिकाणी महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून दहा लाख रुपये घेतले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्य़ादी यांनी दहा लाख रुपये परत मागितले असता पैसे परत न करता व लग्न न करता फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अश्लील मेसेज करुन विनयभंग

येरवडा : तरुणीला इंन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीने संपर्क करुन तिला अश्लील मेसेज पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले (Molestation Case). तसेच तरुणीच्या आईला फोन करुन धमकी देऊ त्रास दिला. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सोहम पठाण शेट्टी या इंस्टाग्राम अकाऊंट धारकावर आयपीसी 354(ड), 506, 509 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.