Someshwar Foundation in Pashan Pune | सोमेश्वर फाउंडेशन आयोजित पुणे आयडॉल गायन स्पर्धा: गायकवाड,शर्मा, दास,लागू, ठरले यंदाचे पुणे आयडॉल विजेते

0

पुणे : Someshwar Foundation in Pashan Pune | सोमेश्वर फाउंडेशनच्यावतीने आयोजित २२ व्या पुणे आयडॉल गायन स्पर्धेत रिद्धी गायकवाड (लिटिल चॅम्प्स) सौरभ शर्मा ( युवा) शुभ्रसमीर दास (जनरल) संजय लागू ( ओल्ड इज गोल्ड ) हे विजेते ठरले. तर याच गटांमध्ये देवांश भाटे, गोविंद कांबळे अजय कवठेकर, डॉक्टर सायली बांबुर्डे या उपविजेता ठरल्या. पूजा मोरे आणि आरंभी रिठे यांना उत्तेजनार्थ सन्मानित करण्यात आले. यंदा ४५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यातील साठ स्पर्धक अंतिम फेरीत बालगंधर्व येथे आपले गायन साजरी केले.

जितेंद्र भूरूक,राजेश दातार, मंजुश्री ओक मेधा चांदवडकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. सोमेश्वर फाउंडेशन यांच्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मात्र कलेची आवड जपणारे दीपक मानकर (सामाजिक), माधव जगताप (उप आयुक्त मनपा) सुनील यादव (एसीपी ) इब्राहिम शेख (कायदेविषयक ) शैलेश काळे (पत्रकार) रविराज रांका (उद्योगपती) यांना व्हॉइस ऑफ द चॉईस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सोमेश्‍वर फाउंडेशनचे प्रमुख माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Vinayak Nimhan) यांनी केले होते. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल (Sandeep Singh Gill), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), बाबुशेठ वाळुंज, डॉ. किशोर पंडित, अशोक मानकर, माजी नगरसेविका शैलेजा खेडेकर, दामू कुंबरे, मुकारी अलगुडे, बिपिन मोदी आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उमेश वाघ, अमित मुरकुटे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.