Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : दुचाकीस्वाराला अडवून लुटणाऱ्या तिघांना अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून चाकुचा धाक दाखवून (Robbery Case) लुटमार करणाऱ्या तिघांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.30) महाळुंगे गावच्या हद्दीतील सिग्मा चौकात रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी सोमेश राजेंद्र मिरगे (वय 24 सध्या रा. डोंगरवस्ती मु.पो. निघोजे, मुळ रा. मु.पो. इचलकरंजी ता. हातकणगंले जि. कोल्हापूर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आकाश नागेश मस्के (वय 21), गणेश नागेश मस्के (वय 20), नामदेव लक्ष्मण गिरी (वय 29 सर्व राहणार चिंबळी मुळ रा. जुना मोंढा ता. जि. परभणी) यांच्यावर आयपीसी 394, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून सिग्मा चौकातून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या कानाखाली मारून चाकूचा धाक दाखवला व फिर्यादी यांचा मोबाईल, रोख रक्कम 150 रुपये व गुगल पे वरून 2 हजार 200 रुपये घेत लुटले होते. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून बारा हजार 350 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. सोमेश मिरगे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढत तिन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास कुथे (API Kaillas Kuthe) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.