Traffic Changes In Balewadi Area | बालेवाडीत मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

0

पुणे: Traffic Changes In Balewadi Area | लोकसभेच्या मावळ मतदारसंघाची (Maval Lok Sabha) मतमोजणी (Counting Of Votes) येत्या मंगळवारी (दि.४) होणार आहे. ही मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे.

या कालावधीत सुरक्षितता व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बालेवाडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे,अशी माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे (Pimpri Chinchwad Traffic Branch) पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड (Vishal Gaikwad DCP) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबत शनिवारी (दि. १) आदेश दिले. वाहतुकीतील हा बदल मंगळवारी (दि. ४) पहाटे ५.०० पासून रात्री ११.३० पर्यंत आवश्यकतेनुसार गर्दी संपेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहतुकीत केलेले बदल :

हिंजवडी, वाहतूक विभाग अंतर्गत

  • मंगळवारी (दि. ४) पहाटे ५.०० ते रात्री ११.३० या वेळेमध्ये बालेवाडी स्टेडीयम मुख्य प्रवेशव्दारा समोरील रस्ता उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.

पर्यायी मार्ग : १) चांदे – नांदे व महाळूंगे गावातून येणारी वाहने ही उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक येथून उजवीकडे वळून महाळूंगे पोलिस चौकी येथून पुढे राधा चौकाकडे व इच्छितस्थळी जातील.

२) राधा चौकातून येणारी वाहने ही महाळूंगे पोलिस चौकी येथे डावीकडे वळून पुढे महाळूंगे गाव, चांदे नांदे व पुढे इच्छित स्थळी जातील.

  • मंगळवारी (दि. ४) पहाटे ५.०० ते रात्री ११.३० या वेळेत जड व अवजड वाहनांना महाळूंगे गाव ते राधा चौक आणि राधा चौक ते महाळूंगे गाव या मार्गावर प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : चांदे नांदे येथून येणारी जड अवजड वाहने ही गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण मार्गे हिंजवडी येथे येऊन इच्छित स्थळी जातील, व बाणेर रस्ता व राष्ट्रीय महामार्गावरून येणारी जड अवजड वाहने ही राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी व पुढे इच्छित स्थळी जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.