Shirur Accident News | शिरुर तालुक्यात अपघाताचा थरार, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातून अपघात, पीक अप धडकून एकाचा मृत्यू

0

शिक्रापुर : Shirur Accident News | देशभरात पुण्यातील हिट अँड रन प्रकरण (Porsche Car Accident Pune) जोरदार गाजत असताना. शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्नचीचं पुनरावृत्ती झाली आहे, एका पोलिस पाटलाच्या १५ वर्षीय अल्पवयीन (Police Patil Daughter) मुलीने मालवाहू पिकउप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीसवर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे.

याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे सतिश विठ्ठल मेमाणे (रा.वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती नुसार मयत अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र राउसाहेब बांडे हे दोघेही स्प्लेंडर मोटार सायकल क्रं एम एच 12 व्ही आर 2072 घेवुन रोहित्राचे ऑइल आणण्यासाठी वडगावबांडे येथुन न्हावरे गावात जात होते. जाताना मोटार सायकल अरुण विठ्ठल मेमाणे हा चालवित होता. त्याच्या पाठीमागे महिंद्र राउसाहेब बांडे हा बसलेला होता. सदर मोटारसायकल अरणगाव (ता. शिरुर) येथे आली असताना त्यांच्या मोटार सायकलला अरणगावातील पिकअप नंबर एम एच 12 एस एफ 3439 यावरील चालकाने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा जखमी झाला.

हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहु पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले. पिकअप क्रं एम एच 12 एस एफ 3439 अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी (अंदाजे वय 15) चालवत होती. तिच्या सोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे (Santhosh Nivritti Lende) बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील सदरचा पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवुन सायकलला समोरुन ठोस देवुन सदरचा अपघात केला आहे. तसेच अपघात झाल्यानंतर मदत न करता ते दोघे ही पिकअप सोडुन तेथुन निघुन गेले. याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतिश मेमाणे यांनी फिर्याद दिली असुन अल्पवयीन मुलीचे वडील अरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्यासह अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास शिक्रापुर पोलिस (Shikrapur Police Station) करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.