Shaniwar Wada Pune Crime News | शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

0

पुणे: Shaniwar Wada Pune Crime News | शनिवार, रविवारी शनिवार वाड्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक शनिवार वाडा पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे शनिवार वाडा परिसरात मोठा बंदोबस्त असतो, सिक्युरिटी असते.

याच ठिकाणावरून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. सध्या वाडा पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून बेवारस बॅगची तपासणी करण्याचे काम सुरु आहे.

बेवारस बॅग आढळल्याचा फोन पोलिसांच्या कंट्रोल रुमला (Police Control Room) आला होता. त्यानंतर तात्काळ पोलीस आणि बॉम्बशोधक पथक शनिवार वाड्यात दाखल झाले. पोलीस, बॉम्ब पथक आणि श्वानपथक या ठिकाणी उपस्थित आहे.

पर्यटक, सेक्युरिटी यांना बाहेर काढण्यात आले आहे. या बॅगमध्ये नक्की काय आहे? ही बॅग कोणी ठेवली आहे? याचा तपास सध्या सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.