Ravindra Dhangekar On Hasan Mushrif | ‘मुश्रीफांची माफीच का? त्यांच्या पायावर लोटांगण घालतो, पण…’ धंगेकरांचा इशारा (Video)

0

पुणे: Ravindra Dhangekar On Hasan Mushrif | पुण्यातील पोर्श कार अपघात (Porsche Car Accident Pune) प्रकरणात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पुणे अपघात प्रकरणाचे धागेदोरे ससून रुग्णालयातील डॉक्टरांपर्यंत पोहोचले. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉ.अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघांना बेड्या ठोकल्या.

अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुना अहवालात बदल केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. यातील डॉ. तावरे यांच्यावरून आमदार रवींद्र धंगेकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात बरेच आरोप-प्रत्यारोप झाले.

आमदार धंगेकरांनी केलेल्या आरोपांवर माफी मागा अन्यथा मानहानीच्या कारवाईला सामोरे जा असे मुश्रीफांनी प्रत्त्युत्तर दिले. याबाबत आता आमदार धंगेकर यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेतून मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे.

आमदार धंगेकर म्हणाले, ” पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, येथे देशभरातून विद्यार्थी शिकायला येतात; पण त्यांना चुकीच्या मार्गाला लावण्याचे काम काही यंत्रणा करीत असताना राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा शेवट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझं पुणे सुरक्षित नसेल तर आमदार, खासदारकीचे मुकुट मला काय करायचे ?

या प्रकरणात मला धमक्याही दिल्या आहेत. हसन मुश्रीफ यांनी तर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मी पुणेकर आहे, कोणाला घाबरत नाही. त्यांची माफीच का? त्यांच्या पायावर लोटांगण घालतो, त्यांनी पुण्यातील ‘पब’ संस्कृती हद्दपार करावी. मुळात मंत्री मुश्रीफ यांनाही या गोष्टी पटलेल्या नाहीत; पण ते सरकारसोबत असल्याने नाइलाज आहे.

वडिलांसारख्या शरद पवार यांना मंत्री मुश्रीफ सोडून गेले त्यांनी मला दम देऊ नये, असा इशारा देत एवढेच त्यांना वाटत असेल तर हे प्रकरण जलद न्यायालयात न्यावे, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.