Ravindra Dhangekar On Dr Ajay Taware | ‘पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या डॉ. तावरेला भरचौकात फाशी दिली पाहिजे’; धंगेकरांचे वक्तव्य

0

कोल्हापूर : Ravindra Dhangekar On Dr Ajay Taware | पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या (Builder Vishal Agarwal) अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्शे कार बेदरकारपणे चालवून मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुण अभियंते जागीच ठार झाले. त्यात एक तरुणी आणि एका तरुणाचा समावेश होता. दोघेही आयटी इंजिनिअर होते. या अपघातात अनिस अवधिया Aneesh Awadhiya (वय २७) आणि अश्विनी कोस्टा Ashwini Costa (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला.

कल्याणीनगर (Kalyani Nagar Car Accident Pune) येथील लँडमार्क सोसायटीजवळ १९ मे (रविवार) पहाटे अडीच वाजता हा भीषण अपघात झाला. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोपही रंगले आहेत. आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या डॉ. तावरेला भरचौकात फाशी दिली पाहिजे असे वक्तव्य कोल्हापूर (Dhangekar Kolhapur PC ) येथील पत्रकार परिषदेत केले आहे. (Porsche Car Accident Pune)

आमदार धंगेकर म्हणाले, ” ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही. धंगेकर हा घाबरणारा माणूस नाही. सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये. मी पुणेकर आहे घाबरणारा नाही.

४ तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत (Lok Sabha) असेन. पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे.

सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे. महसूल असो किंवा गृहखाते असो हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही हे लक्षात आल्यावर दोन पोलीस निलंबित केले. असे धंगेकर यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.