Ramtekadi Pune Crime News | पुणे : चेष्टा मस्करी अती झाली, रामटेकडी येथे रस्त्यावर मित्रांनीच केला मित्राचा खून

0

पुणे : – Ramtekadi Pune Crime News | मित्रांमध्ये एकमेकांची चेष्टा मस्करी करणे हे काही नवीन नाही. मात्र, चेष्टा मस्करी करण्यातून मित्राला बेदम मारहाण करुन तरुणाचा खून (Murder In Ramtekadi) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया (ramtekdi Industrial Estate) परिसरात घडली आहे. ही घटना 27 मे रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान टेकडीच्या पायथ्याला घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) पाच जणांना अटक केली आहे.

मंगेश मधुकर बामणे (वय-36 रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर राजु शितोळे (वय-25), रोहित ज्ञानेश्वर गायकवाड (वय-25), विशाल राजु शितोळे (वय-28) आकाश जयसिंग चव्हाण (वय-21 सर्व रा. स.नं. 106, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) यांच्यावर आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत यमुना मधुकर बामने (वय-55) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी यांचा मुलगा मंगेश एकमेकांचे मित्र आहेत. 27 मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंगेश आणि त्याचे मित्र व्हि मॅक कंपनी समोरील रोडवर (V Mack Company Road Hadapsar) टेकडीच्या पायथ्याला गप्पा मारत थांबले होते. त्यांच्यामध्ये चेष्टा मस्करी सुरु होती. आरोपींनी संनमतकरुन मंगेश सोबत चेष्टा करण्यास सुरुवात केली. त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मारहाण केल्याने मंगेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. वानवडी पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे (Sr PI Sanjay Patange) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.