Kalyani Nagar Car Accident Pune | ‘ते ब्लड सॅम्पल मुलाच्या आईचे नाहीच’… ; पोलिसांकडून खुलासा

0

पुणे: Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणात नव्याने खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आरोपी मुलाला वाचवण्यासाठी अनेक उपद्व्याप केल्याचे समोर येत आहे. अपघात घडल्यानांतर अल्पवयीन मुलाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. (Blood Sample Temparing Case)

त्यावेळी तिघांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले. पण, रक्त तपासणीसाठी त्यांचे रक्त न देता त्यांच्याऐवजी इतर तीन व्यक्तींचे रक्त नमुने पोलिसांच्या ताब्यात दिले. ते रक्त नमुने त्यांचेच आहेत, हे भासवण्यासाठी आरोपींचा जो रक्तगट आहे, त्याच रक्तगटाचे तीन जण आहेत ना याची दक्षता घेण्यात आली होती. (Pune Porsche Car Accident Case)

आरोपी मुलासाठी दिलेले रक्त हे मुलाच्या आईचे असल्याची चर्चा सर्वत्र झाली होती. परंतु, रक्तांच्या नमुन्याचा प्राप्त झालेला अहवाल आणि नमुन्यांसाठी दिलेले रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचे नसल्याचे पोलिस (Pune Police) तपासात समोर आले आहे. त्यामुळे ते रक्त नेमकं कोणाचे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रक्तांच्या नमुन्याचा प्राप्त झालेला अहवाल व ते नमुन्यांसाठी दिलेले रक्त संबंधित मुलाच्या आईचे नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी नंतर काढलेल्या रक्ताच्या डीएनए शी (DNA Test) आईच्या रक्ताचे नमुने जुळले नसल्याने ते मुलाच्या आईचे नसल्याचे स्पष्ट झाले. (Pune Crime Branch)

Leave A Reply

Your email address will not be published.