Baramati Politics News | लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत

0

बारामती: Baramati Politics News | राजकारणाच्या पटलावर नात्यांमधील लढाई भावनिकतेच्या दृष्टीने अधिक त्रासदायक असते. नात्यांमधील राजकीय लढाई कधी मुंडे कुटुंबात, कधी ठाकरे कुटुंबात, आपणाला पाहायला मिळाली. बारामतीची ओळख मागच्या पाच दशकांपासून ज्या पवारांमुळे ओळखली जाते त्या पवार कुटुंबात अशी लढाई होणार नाही असे वाटत होते.

तिथे लोकसभेच्या निवडणुकीसाठी पवारांच्याच घरातले प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे राहिले. .सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar). ही लढाई मुलगी विरुद्ध सून आहे, की भावजय विरुद्ध नणंद आहे, की राष्ट्रवादीचा एक गट विरुद्ध दुसरा गट आहे की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे? हे निवडणूक पार पडेपर्यंत मतदारांच्याही ध्यानात आले नाही.

पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार हे समीकरण गेली पाच दशकं राज्यात रुजले आहे. बारामतीमध्ये पवारांविरोधात आतापर्यंत कोणताही उमेदवार टिकला नव्हता. भाजपकडून अनेकदा प्रयत्न झाले, पण पवारांच्या बारामतीला धक्का लागला नव्हता. पण यावेळची निवडणूक पूर्णपणे वेगळी होती. यावेळी शरद पवार यांच्याविरोधात अजित पवार यांनीच शड्डू ठोकला.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पवारांच्या बारामतीतच बारामती कोणत्या पवारांची ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांचा प्रभावी जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाते.

राजकारणाबाबत वेळ आल्यावर पाहू, सध्या लोकांचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात गेल्या आठवड्यापासून ‘अॅक्टिव्ह’ झाले आहेत. पक्ष कार्यालयात जय पवार हे नागरिकांना भेटत आहेत.

बुधवारी (दि. २९) त्यांनी बारामतीत नागरिक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी; अडचणी समजून घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील राष्ट्रवादी भवनात नागरिक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या अडचणी आणि कामांबाबत जय पवार यांनी चर्चा केली. यावरून आता आगामी काळात पवार विरुद्ध पवार राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.