Vasant More On Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज; वसंत मोरेंचे भाष्य

0

पुणे: Vasant More On Jitendra Awhad | महाड येथील चवदार तळ्याच्या (Chavdar Tale Mahad) परिसरात आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडून केलेल्या अवमाना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी महाड तळ्याजवळ या गोष्टीचा निषेध करत चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. यावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. परंतु यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचे समोर आले.

याबाबत आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला. जितेंद्र आव्हाडांना मनोविकार तज्ज्ञाला दाखवा. मग शांत होईल. त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. ” स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये.

आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. आव्हाडांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील” असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तर आनंद परांजपे यांनी आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.