Hinjewadi IT Company | हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचे स्थलांतर; शासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज

0

पुणे: Hinjewadi IT Company | हिंजवडी भागातील ३७ आयटी कंपन्या सुविधांचा अभाव असल्याचे कारण देत स्थलांतरित झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये काम करीत असलेल्या अभियंत्यांच्या रोजगाराचे काय ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन (Hinjewadi Industrial Association) कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

हिंजवडी आयटीपार्कचा (Hinjewadi IT Park) परिसर हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या अखत्यारित येतो. आयटीनगरीत जाण्यासाठी पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातून अभियंत्यांना वाहतूककोंडीचा (Traffic Jam In Hinjewadi) मोठा त्रास करावा लागतो. त्याचबरोबर विविध समस्यांना आयटीयन्सला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे कंपन्यांच्या कामावर परिणाम होत आहे. आयटी इंजिनिअरचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये परिसरातील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. त्यातील काही कंपन्या मगरपट्टा सिटी, चेन्नई, हैदराबाद अशा विविध भागांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

पुण्यात असणाऱ्या हिंजवडी परिसरात १९९७ पासून आयटीनगरी उभारण्याचे काम सुरु झाले. तत्कालीन केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन आणि राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते २००० साली या उद्योगनगरीचे उदघाटन झाले होते. याठिकाणी दीडशे हुन अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कंपन्या आहेत.

“हिंजवडी आयटीपार्कमधून बाहेर आल्यानंतर आयटी अभियंत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या कंपन्यामधे येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी त्यांना येण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तसेच जवळपासच्या परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये कंपन्यांनी स्थलांतर केले आहे.

येथील प्रश्नाबाबत राज्यशासनाला अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे. त्यावर उपाययोजना होण्याची गरज आहे अन्यथा अनेक कंपन्या बाहेर जातील अशी प्रतिक्रिया कर्नल योगेश जोशी सचिव, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.