Hamare Baarah | ‘हमारे बारह’ चित्रपटावर वाद, अभिनेत्याला ठार मारण्याची धमकी, अन्नू कपूर म्हणाले – आधी पहा तर…

0

नवी दिल्ली : Hamare Baarah | अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) स्टारर चित्रपट ‘हमारे बारह’चा टीजर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. टीजरमध्ये महिलांबाबत काही वक्तव्य करण्यात आले आहे. चित्रपटातील एक पात्र महिलांची तुलना सलवारमधील नाडीशी करताना दिसत आहे. ते पात्र म्हणते, महिला पुरूषांसाठी शेती सारख्या आहेत, ज्याला पाहिजे तेव्हा तो शेती करूशकतो.

टीजरमध्ये महिलांच्या वेदना दिसून आल्या होत्या. तर यातील पात्राची अशी वक्तवे ऐकून प्रेक्षक संतापले. चित्रपटाचे टीजर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला विरोध केला जात आहे. यावर आता अभिनेते अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका मीडिया एजन्सीसोबत बोलताना अन्नू कपूर म्हणाले, मला माहित नाही किती चित्रपटांना कॉन्ट्रवर्सीने घेरले आहे. हा चित्रपट वादात सापडला आहे तो नावामुळे. परंतु, चित्रपट कुणीही पाहिलेला नाही आणि आम्हा कलाकारांना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, शिव्या दिल्या जात आहेत, वाईट बोलत आहेत. चित्रपट पाहिला नाही आणि जजमेंट देत आहेत.

दरम्यान, सेन्सॉरने हा चित्रपट मंजूर केला आहे. हमारे बारह चित्रपट डायरेक्टर कमल चंद्र यांनी बनवला आहे. तो ७ जूनला प्रदर्शित होणार आहे. मात्र, वादात सापडलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.