UPI Payment | HDFC बँकेचा मोठा निर्णय, आता इतक्या रुपयांपेक्षा कमी असेल UPI व्यवहार तर येणार नाही SMS अलर्ट, जाणून घ्या

0

नवी दिल्ली : UPI Payment | तुम्ही जेव्हा यूपीआय व्यवहार करता तेव्हा तुम्हाला बँकेद्वारे एसएमएस अलर्ट पाठवून माहिती दिली जाते. तुम्ही १,००० रुपयाचे पेमेंट करा अथवा १ रुपयाचे, एसएमएसद्वारे समजते की, तुमच्या खात्यातून पैसे काढले आहेत. परंतु, आता प्रत्येक ट्रांजक्शनवर तुम्हाला बँकेने अलर्ट पाठवलाच पाहिजे हे आवश्यक नाही. कारण, खाजगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीने कमी पैशाच्या व्यवहारांवर एसएमएस अलर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचा हा निर्णय २५ जूनपासून लागू होईल. बँकेने नुकतीच याबाबत ग्राहकांना ही माहिती दिली.

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिलेल्या माहितीनुसार, २५ जूनपासून कमी पैशांच्या व्यवहारांशी संबंधीत एसएमएस पाठवला जाणार नाही. मात्र, पैसे मिळणे आणि पाठवणे, या दोन्हीसाठी अलर्टची मर्यादा वेगवेगळी आहे.

बँकेने ग्राहकांना सांगितले आहे की, यूपीआयद्वारे १०० रुपयांपेक्षा कमी खर्चाचा आता एसएमएस येणार नाही. याशिवाय ५०० रुपयांपर्यंतच्या क्रेडिटचा सुद्धा अलर्ट येणार नाही. मात्र, ई-मेल अलर्ट, प्रत्येक टड्ढांजेक्शनचा मिळेल. यासाठी बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना आपला ईमेल आयडी अपडेट करण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांना प्रत्येक व्यवहाराचा अलर्ट मिळावा.

छोट्या व्यवहारांसाठी वाढला यूपीआयचा वापर

मागील काही वर्षांपासून यूपीआयद्वारे व्यवहारात ट्रांजक्शनची सरासरी व्हॅल्यू हळुहळु कमी होत आहे. वर्ष २०२२ च्या दुसऱ्या सहामाहीत ते १,६४८ रुपयावरून ८ टक्के कमी होऊन २०२३ च्या दुसऱ्या सहामाहित १,५१५ रुपये झाले. यावरून समजते की, छोट्या व्यवहारांसाठी युपीआयचा वापर वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.