Pune Solapur Highway Accident | पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर पाण्याचा टँकर- इर्टिंगा कारचा भीषण अपघात, वाहनाचा चक्काचूर

0

पुणे : – पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway Accident) पाण्याचा टँकर आणि इर्टिगा कारचा (Ertiga Car) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.28) दुपारी बाराच्या सुमारास दौंड तालुक्यातील खडकी येथे झाला. खडकी येथे महामार्गाच्या दुभाजकातील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला भरधाव वेगातील कारची पाठीमागून धडक बसली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. (Pune News)

दौंड तालुक्यातील खडकी येथे लक्ष्मीनाराण मंगल कार्यालयाजवळ दुभाजकामधील झाडांना टँकरने पाणी घातले जात होते. त्यावेळी सोलापूर कडून पुण्याला येणाऱ्या भरधाव इर्टिगा गाडी (एमएच 14 एलबी 7071) टँकरला पाठीमागून जोरात धडकली. अपघातात इर्टिगा गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणारे सहा जण जखमी झाले असून त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आहे. झाडांना पाणी घालणाऱ्या टँकर चालकाने पाठीमागे रिफ्लेक्टर लावले असते तर अपघात झाला नसता. टँकर चालकाने रिफ्लेक्टर न लावल्यामुळे अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.

अपघात झाल्यानंतर नागरिकांनी यांची माहिती महामार्ग पोलिसांना व रुग्णवाहिकेला दिली. मात्र, एक तास उलटूनही घटनास्थळी रुग्णवाहिका आली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुभाजकामधील झाडांना पाणी घालताना टँकर चालकाने रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. यामुळे मागून येणाऱ्या वाहन चालकाला पुढे वाहन असल्याचे लक्षात येते. मात्र, याकडे दुर्लक्ष करुन अपघातांना निमंत्रण दिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.