Pune Porsche Car Accident Case | 2 तासात 14 कॉल…, पोर्शे कार प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरवर असा आणला दबाव

0

पुणे : Pune Porsche Car Accident | पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलच्या अदला-बदली प्रकरणाचा (Swapping Blood Sample) तपास सध्या सुरू आहे. तीन सदस्यीय कमिटीने मंगळवारी ससून जनरल हॉस्पिटलला (Sassoon Hospital) भेट दिली. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.

चौकशी दरम्यान समजले की, आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे (Dr Ajay Taware) आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) यांच्यात व्हॉट्सअप (Whats App Call) आणि फेसटाईमवर चौदा कॉल (Facetime) आणि एक साधा कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी ८:३० ते १०:४० च्या दरम्यान करण्यात आले होते आणि सकाळी ११ वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.

पोलिसांनी १९ मे रोजी झालेले अपघाताच्या दुसऱ्या दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे संकेत दिले होते. खाजगी रुग्णालयात डीएनएसाठी (DNA Test) घेतलेले ब्लड सॅम्पल आणि ससूनमधील ब्लड सॅम्पल न जुळल्याने हे प्रकरण उघड झाले होते.

यानंतर ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तवारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Sharihari Halnor) आणि कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. या तिघांवर आरोप आहे की, त्यांनी लाच घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले होते, जेणेकरून कार चालक अल्पवयीन आरोपीने दारू प्यायली असल्याचे उघड होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.