PM Narendra Modi On Mahatma Gandhi | गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : PM Narendra Modi On Mahatma Gandhi | महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हते. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झाले. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केले नाही, असे वादग्रस्त वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांना राष्ट्रपिता म्हटले जाते आणि ज्यांचा धसका इंग्रजांनी देखील घेतला होत, ते राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगभरात सुपरिचित आहेत, मात्र देशाच्या पंतप्रधानांनीच अशाप्रकारचे अनाकलनिय वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मोदी पुढे म्हणाले, जगभरात जर मार्टीन ल्यूथर किंग आणि नेन्सन मंडेला यांना ओळखले जाते. मात्र, गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधीच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावले आहे, असे मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.