Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : फसवणुक करण्यासाठी बँक खाते उपलब्ध करुन देणाऱ्या आरोपीला पिरंगुटमधून अटक, पिंपरी-चिंचवड सायबर सेलची कारवाई

0

पिंपरी : – Pimpri Chinchwad Cyber Police | ऑनलाईन टास्क (Online Task) आणि शेअर बाजारात (Share Market) चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून (Lure Of Good Returns) ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Cheating Fraud) घटना वाढल्या आहेत. सायबर चोरटे (Cyber Thieves) वेगवेगळे आमिष दाखवून लोकांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. अशाच एका प्रकरणातील फसवणुकीची रक्कम घेण्यासाठी बँक खाते उपलब्ध करुन देणाऱ्या एकाला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीच्या खात्यावर मागील काही दिवसांत तब्बल अडीच कोटींचा व्यवहार झाला असून या खात्यासंदर्भात देशभरातून 72 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

लक्ष्मण अमृत गेजगे (रा. पौड रोड, पिरंगुट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड येथील महिला व्हॉट्सअॅप बघत असताना तिला पार्टटाईम जॉबसाठी मेसेज आला. महिलेला नोकरीची गरज असल्याने नोकरी संदर्भात विचारणा केली असता आरोपीने त्यांना शेअरचाट व्हिडीओ लाईक आणि शेअर करण्यास सांगितले. तसेच तीन शेअरचाट व्हिडीओ लाईक केल्यानंतर फिर्यादी यांना 120 रुपये मिळतील असे सांगितले.

त्यानुसार महिलेला पैसे मिळाले. त्यानंतर प्रिपेड टास्क घेण्यास सांगून सुरुवातीला एक हजार भरण्यास सांगितले. त्या बदल्यात जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेकडून 1 कोटी 2 लाख 83 हजार 648 रुपये घेऊन कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलचे उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे आणि पोलीस शिपाई कृष्णा गवळी करीत आहेत.

तांत्रिक तपास केला असता महिलेने एकूण 20 बँक खात्यात पैसे पाठवले होते. त्यापैकी इंडसइंड बँकेच्या खात्यामध्ये 3 लाख रुपये भरण्यात आले होते. अकाउंट स्टेटमेंटचा तांत्रिक तपास केला असता त्या अकाउंटला अडीच कोटी रुपयांचे ट्रान्झेक्शन झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अकाउंट धारकाचा शोध घेऊन लक्ष्मण गोजगे याला अटक केली. लक्ष्मण गेजगे याच्या खात्याबाबत संपूर्ण भारतातून 72 तक्रारी आलेल्या आहेत. त्याने सायबर गुन्हेगारांना त्याचे बँक खाते उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार कृष्णा गवळी, बनसोडे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.