Liquor party in Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्तालयात दारूची पार्टी?, आढळल्या दारुच्या बाटल्या; आयुक्तांच्या कारवाईकडे लक्ष (Video)

0

पुणे : – Liquor party in Pune CP Office | पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका धनिकपुत्राने आलिशान पोर्शे कारने दोन तरुणांना उडवले (Porsche Car Accident Pune). यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पुणे पोलिसांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार ताजा असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलीस ऑन ड्युटी ड्रिंक करुन काम करतात की काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. या गंभीर प्रकारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तालयातच पोलीस ओली पार्टी करत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. मात्र, ही ओली पार्टी नेमकं कोण करतं असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आयुक्तालयात येणाऱ्या प्रत्येकाची चेकींग आणि रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. एवढी सुरक्षा असताना आयुक्तालयात दारुच्या बाटल्या आल्या कशा आणि कोणी आणल्या? कोण कोणत्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयात ओली पार्टी केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठ घेऊन संबंधितांवर कारवाई करणार की चौकशी करणार असल्याचे सांगून हा प्रकार दाबणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पोलीस आयुक्तलयाच्या आवारात गुन्हे शाखेची (Pune Crime Branch) इमारत आहे. याच इमारतीच्या काही अंतरावर आणि पाठीमागे मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. पोलीस आयुक्तालयात सर्वसामान्यांना यायचे असेल तर गेटवर त्यांची संपूर्ण चौकशी केली जाते. त्यांचे नाव, ओळखपत्र, काय काम आहे, कोणाला भेटायचे आहे, अशी सर्व चौकशी करुन नागरिकांना आत सोडले जाते. सहजासहजी सामान्य नागरिकांना आयुक्तालयात येणं शक्य नाही. तसेच जर एखादा व्यक्ती गाडी घेऊन आला तर पोलिसांकडून त्या गाडीची तपासणी केली जाते. एवढी सुरक्षा घेतली जात असताना पोलीस आयुक्तालयात दारुच्या बाटल्या आणल्या कोणी? एकीकडे पुण्यात ड्रँक अँड ड्राईव्हचा प्रकार घडला असताना आयुक्तालयात ऑन ड्युटी ड्रिंक (On Duty Drink) असा काही प्रकार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात आरोपच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काल चौकशी पथक ससुन हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) आले होते. त्यावेळी या पथकाला एका नामांकित हॉटेलमधून बिर्याणी मागवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आज (बुधवार) पोलीस आयुक्तालयाच्या आवारात रिकाम्या दारुच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे व्हिडीओतून समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्तालयातील हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार या प्रकरणाची कशी दखल घेतात आणि काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.