Jarandeshwar Factory Scam – Pune ACB | जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी जुन्या काळातील

0

पुणे: Jarandeshwar Factory Scam – Pune ACB | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पूर्वी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे वक्त्यव्य केले होते. त्यांनतर काही दिवसातच अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी पूर्वी अनेक नेत्यांवर भष्टाचाराचे आरोप होऊन त्यांना संबंधित विभागाकडून नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या.

लोकसभा निवडणूक संपताच सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. या कारखान्याच्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबीकडून चौकशी सुरू आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची २०१० सालात विक्री करण्यात आली होती. तो मूळ किमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात जरंडेश्वरशी संबंधित राजेंद्र घाडगेंना समन्स बजावण्यात आले आहे. राजेंद्र घाडगे हे अजित पवारांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. जरंडेश्वर कारखान्यातला गैरव्यवहार, कोरेगावमधला एक भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

जरंडेश्वर साखर कारखान्याशी अजित पवारांचा संबंध काय?

कारखाना विक्रीच्या काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्वावर देण्यात आला. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सॉईल प्रा.लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे.
ईडीने चार्जशीटमधून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे नाव वगळले होते.

याबाबत अजित पवार यांच्या कार्यालयाकडून ही चौकशी जुन्या काळातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

news link https://marathi.abplive.com/news/pune/ajit-pawar-clarification-on-acb-investigation-on-jarandeshwar-sugar-factory-satara-ed-case-maharashtra-marathi-news-1285745

Leave A Reply

Your email address will not be published.