Jalgaon Hit & Run Case | ‘हिट अँड रन’ प्रकरणात एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, त्यावेळी आरोपींच्यासोबत कारमध्ये एक मुलगी होती

0

जळगाव : Jalgaon Hit & Run Case | जळगावच्या रामदेववाडी येथील अपघातात भरधाव कारने धडक दिल्याने महिला आणि तीन मुले अशा चार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा अपघात झाला तेव्हा कारमध्ये चार ते पाच जण आणि एक मुलगी आरोपींच्यासोबत होती, असे खडसे यांनी म्हटले आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाप्रमाणेच या अपघाताची व्याप्ती देखील आता वाढत चालली आहे.

दरम्यान, जळगाव अपघातावरून एकनाथ खडसे यांनी पोलीस आणि सरकारवर गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, यास प्रकरणात पोलीस अधीक्षक यांचे सुद्धा सीडीआर तपासले पाहिजे. कारण त्यांनासुद्धा पुन्हा-पुन्हा मंत्र्यांचे फोन आले, हे समोर येऊ शकेल.

खडसे म्हणाले, रामदेववाडी येथील अपघात प्रकरण हे संपूर्ण संशयाच्या भोवऱ्यात आहे. आरोपींना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळे पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचे दिसत आहे. आरोप आक्षेपार्ह असू शकतात. मात्र या प्रकरणातला सत्य बाहेर आले पाहिजे.

खडसेंनी सरकारवर टीका करताना म्हटले की, पुण्याच्या घटनेची नोंद सरकार जेवढ्या गंभीरतेने घेत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा चार जणांचा मृत्यू झाला असतानाही सरकार गंभीरतेने घेत नाही. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी. आरोपी १७ दिवस रुग्णालयात राहण्यासारखे नव्हते. तरीही अटक केली नाही.

या प्रकरणातील एका आरोपीचा बाप हा मंत्र्यांचा पीए आहे. तर दुसऱ्या आरोपीचे वडील हे उच्चस्तरीय राजकारणी आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर दबाव आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक आरोपींना मदत करण्याची भूमिका पोलिसांची दिसत आहे. पोलीस कुठल्यातरी राजकीय दबावाखाली आहेत, असे खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.