Dr Ajay Taware | ‘डॉ. अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे’; ससूनच्या वॉर्ड बॉयकडून धक्कादायक माहिती

0

पुणे: Dr Ajay Taware | कल्याणीनगर अपघात (Kalyani Nagar Accident) प्रकरणाचे धागेदोरे ससून रुग्णालयापर्यंत पोहोचले आहेत (Porsche Accident Pune) . पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत तेथील डॉक्टरांनी रक्त चाचणीच्या अहवालात फेरफार केल्याबाबत दोन डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे.

पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आरोपी मुलाचे रक्त बदलण्याचा सल्ला डॉ. अजय तावरे यानेच बिल्डर विशाल अगरवाल याला दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अजय तावरेच्या अडचणी अजूनच वाढत चालल्या आहेत.

ससूनच्या वॉर्ड बॉयकडूनही या प्रकरणाबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अजय चंदनवाले (Ajay Chandanwale) आणि अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे असे ससूनला वॉर्ड बॉय (Sassoon Ward Boy) म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

” माझे वडील आजारी होते, त्यानंतर वडिलांना हे सोडत नव्हते. तुम्हाला इथं काम करावं लागेल. तुमच्या मुलाला करायला सांग, असं सांगून आमच्यावर दबाव आणला. मी अपंग असूनही इथं कामाला सुरुवात केली. शासनाकडे मी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मी तीन वर्षे इथं काम करतोय. अजय तावरेने मला टॉयलेट बाथरूम धुवायला लावले. माझं कुटुंब उद्धवस्त झाले आहे, मला सहा वर्षे त्रास भोगावा लागला आहे. मला कामावर घ्या, माझी उपासमारी होत आहे, माझी मिसेस सोडून गेली आहे. मी आत्मदहन करेल “असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.

रक्त बदलल्यावर मद्यपाशन केल्याचा अहवाल येणार नाही असे डॉ. तावरेनेच विशाल अगरवालला सांगितले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.