Yogendra Yadav Analysis For Maharashtra | महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला लोकसभेच्या किती जागा मिळणार? योगेंद्र यादव यांनी सांगितले आकडे

0

मुंबई : Yogendra Yadav Analysis For Maharashtra | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) मतमोजणीची तारीख आता जवळ येऊ लागली आहे. निकालासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. विविध राजकीय विश्लेषकांनी देशात इंडिया आघाडी (India Aghadi) आणि भाजपाला (BJP) किती जागा मिळतील याचे अंदाज वर्तवले आहे. आता प्रसिद्ध राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आणि महायुतीला (Mahayuti) लोकसभेच्या एकुण किती जागा मिळतील, याची आकडेवारी मांडली असून ती इंडिया टुडेने प्रसिद्ध केली आहे.

देशाचा लोकसभा निवडणूक अंदाज वर्तवताना योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, भाजपाला एकट्याला २६० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. ३०० पार करणही त्यांना अशक्य आहे. भाजपा २७५ किंवा २५० च्या खाली येईल. भाजपाला तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी घटक पक्षांची मदत घ्यावी लागेल.

योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्राबद्दल अंदाज वर्तवना म्हटले आहे की,

महाराष्ट्रात भाजपा आणि त्यांच्या घटक पक्षांना म्हणजे शिंदे गट, अजित पवार गटाला ५ ते १५ जागांच नुकसान होऊ शकते. २०१९ मध्ये महायुतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. म्हणजे यावेळी त्यांचा आकडा २५ ते २७ पर्यंत येऊ शकतो. याचा अर्थ मविआला २० ते २२ जागा मिळू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.