Protest Of BJP Yuva Morcha At SPPU | शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात विद्यार्थींना त्रास देणार कॉंग्रेस प्रणित NSUI च्या अध्यक्षाला अटक करा – दुष्यंत मोहोळ (Video)

0

पुणे : पुणे विद्यापिठात विद्यार्थिनां त्रास देणाऱ्या कॉंग्रेसच्या NSUI अध्यक्षाविरोधात पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले विद्यापिठात हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थींनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात, कॉंग्रेस पक्षाची NSUI ही संघटना पुणे विद्यापिठात कार्यरत आहे, या संघटनेचा अध्यक्ष अक्षय कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विद्यापिठातील शेकडो मुलीनां त्रास दिल्याची तक्रार चतु:शृंगी पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे, अक्षय कांबळे (Akshay Kamble) विरोधात पोलीसांच्याकडुन कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले.

यावेळी पिडित विद्यार्थींनी भाजपा युवा मोर्चा सोबत संपर्क साधला असता, युवा मोर्चाचे सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, आशिष सुर्वे, अपृर्वा खाडे, ओंकार डवरी, शिवाजीनगर युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत डाबी, युवती मोर्चाच्या अध्यक्षा मनिषा धारणे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित मध्ये आज आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना युवा मोर्चाचे सरचिटणीस दुष्यंत मोहोळ म्हणाले, अक्षय कांबळे हा निर्ढावलेल्या मनोवृत्तीचा असुन याने व याच्या साथीदारांनी अनेक मुलीनां त्रास दिला आहे, तसेच विद्यापीठात दादागीरी करणे असले प्रकार NSUI च्या टोळीकडुन नेहमीच चालु होते, पुणे शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये जाऊन दादागिरी, बार्टी सारख्या संस्थेमध्ये तिथल्या आधिकाऱ्यानां शिवीगाळ करणे असले उद्योग कॉंग्रेस प्रणित NSUI चा अध्यक्ष अक्षय कांबळे व त्याचे साथिदार करत आहेत. त्यानां अटक करुन त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी अन्यथा याविरोधात उग्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.