Illegal Bangladeshi Migrant Arrested in Pune | पिंपरी चिंचवड शहरात पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य

0

पिंपरी : – Illegal Bangladeshi Migrant Arrested in Pune | बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी चिंचवड (Illegal Bangladeshi Migrant Arrested in Pimpri Chinchwad) येथील भोसरी परिसरातील शांतीनगर (Shanti Nagar Bhosari) येथे राहत असणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने Anti-Terrorism Squad (ATS) अटक केली आहे. शुक्रवारी (दि.25) सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शमीम नुरोल राणा (वय 26 रा. जमलपूर, जि. ढाका), राज उर्फ सम्राट सदन अधिकारी (वय 27 रा. लक्ष्मीपूर जि. मदारीपूर), जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय 38 रा. चर आबूपूर, जि. बोरीसाल), वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा (वय 26 रा. फुलबरिया), आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर (वय 32 रा. फुलबरिया जि. मयमेनसिंग, बांगलादेश) या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तर त्यांना बनावट कागदपत्रे (Fake Documents) बनवून देणाऱ्या इतरांवर आयपीसी 420, 465, 468, 471, 34 सह परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम, पारपत्र (भारतात प्रवेश) आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग अरुण लांडे (वय-32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भागातील शांतीनगर येथे असणाऱ्या ओम क्रिएटीव्ह टेलर या कंपनीमध्ये काही बांगलादेशी नागरिक काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे. त्यात पाच बांगलादेशी नागरिक या ठिकाणी बेकायदेशीर काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे भारतात वास्तव्यास असलेली कोणतीही वैद्य कागदपत्रे उपलब्ध नव्हती.

हे पाच जण भारत आणि बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या कोणत्याही परवानगीशिवाय घुसखोरी करून भारतात वास्तव्यास अल्याचे चौकशीत समोर आले आहे. बांगलादेशी नागरिकाने भारतामध्ये बनावट आधार कार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, व पासपोर्ट बनवून घेऊन त्या आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवले. तसेच बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड व मोबाईल घेतला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.