Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)

0

पुणे: Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाची न्यायालयाच्या आदेशानुसार १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे (Kalyani Nagar Accident) . दरम्यान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) त्यावेळी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या नेतृत्वाखालील समिती येरवडा पोलिसांची चौकशी करणार आहे. दोन एफआयआर का नोंद करण्यात आल्या? कोणी दबाव आणला का? त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी कधी करण्यात आली? इत्यादी गोष्टींचा तपास होणार आहे.

दरम्यान संबंधित अल्पवयीन मुलाची एक व्हिडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. या कथित व्हिडिओ क्लिप मध्ये तो मुलगा शिवीगाळ करीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर नेटकरी चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे.

कथित व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हंटलंय

कथित व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगा रॅप सॉंग बोलताना दिसत आहे. ” कर के बैठा मै नशे… इन माय पोर्शे … सामने आया कपल मेरे.. अब ओ है नीचे .. साउंड सो क्लिंचे सॉरी गाडी चढ आप पे .. सतरा साल की उमर … पैसे मेरे बाप पे .. एक दिन मे मिली मुझे बेल फिर से दिखा दूंगा सडक पे खेल … प्लेइंगद केरोसीन फोंक इन माय नेक्स्ट स्पोर्ट स्कार्स … ” असे कथित व्हिडिओमध्ये भाष्य करण्यात आले आहे.

या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी असलेल्या मुलाच्या आईने एक व्हिडिओ पुढे आणला आहे. ज्यामध्ये शिवानी अगरवाल (Shivani Agarwal) ढसढसा रडताना दिसत आहे.

या व्हिडिओ मध्ये शिवानी अगरवाल म्हणतात की , ” मी शिवानी अगरवाल , अल्पवयीन आरोपी असलेल्या मुलाची आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, तो फेक व्हिडीओ आहे. सध्या माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करते की त्याला प्रोटेक्ट करा.” या व्हिडिओमध्ये त्यांनी मुलाला प्रोटेक्ट करण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.