Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा, ”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”

0

पुणे : Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघातात आता एक नवीन माहिती समोर येत आहे. काल पुणे पोलीस आयुक्तालयात विशाल आग्रवाल (c) याच्या चालकाने, अपघात झाला तेव्हा अल्पवयीन आरोपी गाडी चालवत असल्याचे सांगितले होते, तसेच त्याला चावी देण्यास विशाल अग्रवाल यांनीच सांगितल्याचे तो म्हणाला होता. परंतु आता अपघात झाला ते व्हा मी नव्हे तर ड्रायव्हर गाडी चालवत होता, असे अल्पवयीन आरोपीने म्हटले आहे. तसेच त्याच्या वडीलांनीही असाच दावा केल्याचे एका इंग्रजी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. (Kalyani Nagar Accident)

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज त्यांची कोठडी संपत असून त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. अपघात झाला त्यावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याचे समजते. तसेच, आरोपीचा वडील बिल्डर विशाल अग्रवालनंदेखील (Builder Vishal Agrawal) त्याच्या जबाबत असाच दावा केला आहे. एका इंग्रजी वृत्तसमुहाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

बाप-लेकाच्या या वक्तव्यानंतर ते पोलिसांचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.