Kalyani Nagar Pune Accident |पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाला मद्य देणे भोवले, उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडिया आणि प्रल्हाद भुतडा विरुद्ध चार्जशीट दाखल

0

पुणे : – Kalyani Nagar Pune Accident | पुण्यातील हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघातात दोन आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला (Two IT Engineer Death) . ही घटना कल्याणी नगरमध्ये रविवारी पहाटे तीनच्या सुमारास झाली. ज्या पोर्शे कारने दोघांना धडक दिली त्या कारचा चालक पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा (Builder In Pune) मुलगा असून तो अल्पवयीन आहे. अपघात घडण्यापूर्वी आरोपी अल्पवयीन मुलाने मेरियट सुट्समधील ब्लॅक आणि कोझी रेस्टॉरंटमध्ये (Cosie Restaurant Mundhwa) अशा दोन ठिकाणी पार्टी केली होती. यातील ब्लॅक पब बार विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department Pune) कारवाई केली आहे.

मेरीयट सुट्स या पंचतारांकित हॉटेलच्या ब्लॅक नावाच्या पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विकणे महागात पडले असून याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक सागर चोरडिया (Sagar Chordia) यांच्या विरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. याशिवाय कोझी या बारचे मालक प्रल्हाद भुतडा (Pralhad Bhutada) यांच्याविरुद्ध देखील आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे अशी माहिती, माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षीय मुलावर भादवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन अधिनियम कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अकिब रमजान मुल्ला (वय २४, रा. चंदननगर, मुळ रा. लोकमान्य नगर, आसरा चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.