Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पतीनं गाठला क्रूरतेचा कळस, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गुप्तांगाला खीळ्यांनी छित्र पाडून लावले कुलुप

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. तसेच गुप्तांगाला खीळ्यांनी छिद्र पाडून कुलूप लावल्याची क्रूर घटना समोर आली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. तर पीडित महिलेवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

ही घटना 11 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. याबाबत पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी वाकड पोलिसांना एमएलसी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पिडीत महिलेचा जबाब नोंदवून क्रूर पतीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिला हे नेपाळ मधील असून पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात वास्तव्यास आहे. महिलेचा आरोपी पती तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. तसेच तिला मारहाण करत होता. 11 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने मारहाण केली. तसेच ब्लेडने गुप्तांगावर वार करुन जखमी केले. घरातील चाकू हातात घेऊन महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेचे हात पाय ओढणीने बांधले. त्यानंतर गुप्तांगाला लोखंडी खीळ्यांनी छिद्र पाडून कुलूप लावून गंभीर जखमी केले. जखमी महिलेवर सध्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पीएसआय बालाजी मेटे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.