Karve Road Pune Crime News | पुणे : चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून, कर्वेरोड परिसरातील घटना

0

पुणे : – Karve Road Pune Crime News | पुण्यातील कोथरुड परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने निर्घृणपणे कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Murder In Kothrud). ही घटना कर्वे रोड भागातील डहाणूकर कॉलनी (Dahanukar Colony) परिसरात रात्री बाराच्या सुमारास घडली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय-22 रा. लक्ष्मी नगर, डहाणूकर कॉलनी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Murder In Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, मयत श्रीनिवास हा मित्रांसोबत मध्यरात्री बाराच्या सुमारास जात होता. कर्वे रस्त्यावरील गांधी चौक परिसरात पाच ते सहा जणांनी त्यांना आडवले. टोळक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. श्रीनिवास त्याच्यासोबत असणारा व्यक्ती पळून गेला. परंतु श्रीनिवास टोळक्याच्या तावडीत सापडला. त्यानंतर हल्लेखोरांनी अतिशय निर्घृणपणे त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन घटनास्थळावरुन पळून गेले. (Murder In Karve Nagar)

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडडलेल्या श्रीनिवास याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून श्रीनिवास याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलीस ठाण्यातील (Alankar Police Station) पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून श्रीनिवास याचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.