Prakash Ambedkar On Raj Thackeray | प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाकित, म्हणाले – ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात’

0

मुंबई : Prakash Ambedkar On Raj Thackeray | मला कुठेतरी जाणवायला लागले आहे की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या शिवसेनेचे (Shivsena) अध्यक्ष असले तरी नजीकच्या काळात राज ठाकरे अध्यक्ष होतील. जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्या शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhan Sabha Election In Maharashtra) राज ठाकरे हे मनसे विलीन करुन अध्यक्ष होणार का, किंवा शिवसेना पक्षप्रमुख पद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार का, हे मला जाणवायला लागले आहे, असे मोठे भाकित वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या भाजपने राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भविष्याचा गेम प्लॅन केल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राज ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष भविष्यात उभा राहू शकतो. त्यावेळी ती सर्वायव्हलची अर्थात अस्तित्त्वाची लढाई असेल.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात भाषण करुन आपण शिवसेनेचे अध्यक्ष होणार नाही हे जरी सांगितले असले तरी त्याचा अर्थ होय असा आहे. भाजपचा (BJP) जो गेम प्लॅन आहे तो समजला पाहिजे.

मोदी (PM Narendra Modi) म्हणाले उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करु असे म्हणत त्यांनी गाजर दाखवले आहे. दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना भाजपने प्रचारात घेऊन, हळूवारपणे नोंदणीकृत शिवसेना पक्ष जो एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, ती शिवसेना देण्याचा घाट तर घातला नाही ना असा प्रश्न आहे.

सव्र्हायवल कोणाचे राहणार, जसे इंडिकेट सिंडिकेट काँग्रेस झाली होती त्यावेळी इंदिरा गांधींची (Indira Ghandhi) काँग्रेस वाचली. अशा परिस्थितीत उद्या राज ठाकरे अध्यक्ष झाले तर ते आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी अस्तित्वाची चुरस होईल. त्या चुरशीत कोण तग धरेल, हे बघावे लागेल.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते (Maratha Reservation Andolan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमची त्यांच्याशी युती होऊ शकली नाही. पण विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi-VBA) युती होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.