Jayant Patil | …तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, जयंत पाटलांचा प्लॅन तयार

0

मुंबई : – Jayant Patil | लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातील (Lok Sabha Election Maharashtra) जनतेनं हाती घेतली आहे. जनतेला देशातील संविधान वाचवायचे असून जनता भाजपाच्या विरोधात काम करत असल्याची टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. महागाई बेरोजगारीमुळे जनता प्रचंड त्रासली असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरही भाष्य केलं. ते म्हणाले आता पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे नवीन चेहरे पुढे आले आहेत. तरुण मंडळी चांगलं काम करत आहेत. ज्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल. तरुणांना संधी देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे नेहमीच आग्रही असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

जीएसटीची आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जाते. आंतरराष्ट्रीय किमती कमी असताना गॅस, पेट्रोल, डिझेल महाग झाले आहे. त्यामुळे जनता भाजपच्या विरोधात काम करत असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 32 ते 35 जागा मिळतील असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी निवडणुकीत होत असलेल्या पैशांच्या वाटपावरुन जोरदार टीका केली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पैशांचा प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. शेवटच्या दोन-तीन दिवसात सर्व प्रकराचा अवलंब केला जात आहे. परंतु, निवडणूक आयोग डोळे बंद करुन बसले आहे. पोलीस प्रशासन तक्रार केल्यानंतर जात नाही, असा अनुभव येत आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याची आमची प्रमुख तक्रार असल्याचे ते म्हणाले. बीड परळीमध्ये रिपोलची मागणी आमच्या उमेदवाराने केली. परंतु, बीडचे जिल्हा प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.