Ravindra Dhangekar-Vasant More | रवींद्र धंगेकर, वसंत मोरे वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र; धंगेकर म्हणाले – ‘माझं कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ आली होती’ (Video

0

पुणे : – Ravindra Dhangekar-Vasant More | लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha) चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरे रिंगणात होते. या तिघांनी जवळपास 50 दिवसाहून अधिक काळ शहराच्या अनेक भागात जाऊन प्रचार सभा, रॅली, पदयात्रा काढत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मतदानानंतर तिन्ही उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर गप्पा मारायला येणार होते. मात्र, मुरलीधर मोहोळ हे वाडेश्वर कट्ट्यावर पोहोचले नाहीत. रवींद्र धंगेकर, वसंत मोरे हे दोघेच वाडेश्वर कट्ट्यावर (Wadeshwar Katta) आले. वाडेश्वर कट्ट्यावर प्रचारादरम्यान घडलेल्या गंमती जमती आणि कुरघोड्या असं सर्व ऐकायला मिळाल्या.

निवडणुकीचे मतदान होऊन दोन दिवस झाले असून याचा निकाल चार जूनला लागणार आहे. मात्र, त्याच दरम्यान पुण्यातील शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते. धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित राहून इडली चटणी, शिरा खात दोघांनी त्यांना प्रचारादरम्यान आलेले अनुभव सांगितले. मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ हजर राहू शकले नाहीत. भाजपचे मुरलीधर मोहोळ तब्येत बरी नसल्याने वाडेश्वर कट्ट्यावर आज येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर येतेय.

यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले, मी आजवर दहा निवडणुका लढलो. त्या निवडणुकामध्ये काही वेळा विजयी झालो. तर काहीवेळा पराभव देखील पहण्यास मिळाला. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत काही तरी शिकायला मिळाले. तसं याही निवडणुकीत खूप काही शिकलो. पण या निवडणुकीत माझ्या कुटुंबावर टीका करण्यात आली. त्यामुळे मला प्रचंड त्रास झाला आणि त्रास सहन देखील केला. यामुळे माझं कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ आली होती. पण मी याचं उत्तर येत्या काळात निश्चित देईल.

तसेच या सर्व प्रकारामुळे माझं वैयक्तीक आणि आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माझे कितीही नुकसान होऊ द्या, मी काही घाबरत नाही. मी काहीच घेऊन आलो नव्हतो आणि काही घेऊन जाणार नाही. मी काही पवारसाहेबांच्या किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांना नक्कीच उत्तर देईल असे सांगत त्यांनी भाजप नेत्यांना सुनावलं.

Leave A Reply

Your email address will not be published.